मतदान ओळखपत्राचा तिढा सुटला   

निवडणूक आयोगाकडून स्पष्ट; आता एकाच क्रमांकाचे ओळखपत्र

नवी दिल्ली : एकाच नंबरची दोन मतदान ओळखपत्र निवडणूक आयोगाकडून नागरिकांना दिली गेली होती. त्या मतदान कार्डाचा तिढा सुटला असल्याचा दावा आयोगाने केला असून संबधितांना नवीन नंबरची ओळखपत्रे दिली जातील, असे स्पष्ट केले आहे. सरासरी चार मतदान केंद्रावर एकाच नंबरची अनेक ओळखपत्रे दिसून आली होती. छाननीत उघड झाले होते की, विविध मतदारसंघात आणि मतदान केंद्रात मतदान ओळखपत्रे ही खरी होती. अर्थात मतदारांना नियोजित केंद्रात मतदान करायचे होते. त्यामुळे तसा निकालावर परिणाम झालेला नाही. मात्र, एकाच नंबरच्या ओळखपत्राचा मुद्दा तृणमूल काँग्रेससह विविध पक्षांनी उचलून धरला होता. 
 
मतदार यादीत गोंधळ झाल्याचा आरोपही केला होता. यानंतर मार्चमध्ये आयोगाने या प्रकाराची गांभीर्याने नोंद घेतली. तसेच गेल्या कित्येक दशकांपासूनचा हा प्रश्न तीन महिन्यांत निकालात काढला जाईल, असे सांगितले होते. दरम्यान, ३५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ९९ कोटी मतदारांची छाननी करण्याचे आव्हान मुख्य निवडणूक अधिकार्‍यांसमोर होते. ४ हजार १२३ विधानसभा मतदारसंघातील साडेदहा लाख मतदान केंद्रांतील आकडेवारी गोळा करावी लागली. एका मतदान केंद्रावर सरासरी एक हजार मतदार होते. २००५ पासूनची आकडेवारी तपासण्याचे काम होते २००८ मध्ये मतदार संघात बदल झाले होते. 
 

Related Articles